Yandache Tur Bajarbhav : यंदा कसे राहणार तूर बाजारभाव जाणून घ्या किती होणार घट किंवा वाढ


Yandache Tur Bajarbhav : शेतकरी मित्रांनो,आज आपण जाणून घेऊत की यंदा तुरीच्या उत्पादनात होणार किती घट आणि त्या घटिमुळे किती येणार यंदा तुरीला बाजारभाव तर चला घेऊया जाणून.

असा होणार तुरीच्या भावात बदल:-

पुढील महिन्यापासून नवीन तुरीची आवक बाजारामध्ये बऱ्याच प्रमाणात सुरू होईल... तुरीच्या आवकिनुसार तुरीची घट किंवा वाढ होईल परंतु महाराष्ट्रातील मोठमोठे व्यापाऱ्यांच्या म्हण्यानुसार यंदा तुरीची घट होईल. तसेच यंदा तुरीच्या उत्पादनात १५ ते २० टक्क्यांपर्यंत घट आल्याचे विविध भागांतील शेतकऱ्यांनी सांगितले आहे मात्र मोठ्या आयात आणि नुकत्याच संपलेल्या साठामर्यादेमुळे दर दबावात होते.

सध्या बाजारात तुरीला ५९००० ते ६२००० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.तूर उत्पादकांना चांगला दर मिळावा असे वाटत असेल,तर केंद्राने साठा मर्यादा लावू नये आणि हमिभावाने खरेदीला मान्यता द्यावी, अशी मागणी होत आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या पावसाने तुरीच्या पिकाला काही प्रमाणात झटका बसला.मात्र उत्पादनात किती घट येईल हे आताच सांगणे घाईचे ठरेल.पुढच्या महिन्यापासून बाजारात तुरीची आवक वाढेल. महाराष्ट्र आणि कर्नाटकात पिकाला झटका बसला,तरी सुद्धा मालाची गुणवत्ता टिकून आहे.

अशा हवामानामुळे झाले नुकसान Yandache Tur Bajarbhav:-

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हवामान विभागाने देशातील तूर उत्पादक पट्यांत पावसाचा अंदाज दिल्याने शेतकरी काहीसे चिंतेत होते.

जानेवारी महिन्यापासून तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.त्यामुळे उपलब्धता वाढणार आहे. तुरीची आवक सुरू झाल्यानंतर  पुरवठा वाढून दरावर दबाव येण्याची शक्यता लक्षात घेऊन व्यापारी आणि स्टॉकिस्ट साठ्यातील माल बाजारात आणत आहेत.

देशातील तुरीच्या पीक हातात येण्याच्या काळात आयातही मोठ्या प्रमाणात होत आहे.या आयात केलेल्या तुरीमुळेच दिवाळीसारखा महत्त्वाचा सण असूनही तुरिसह इतर डाळींचे दर दबावात आहेत.परिणामी, कडधान्याचे (Yandache Tur Bajarbhav) दरही हमिभावाच्या आसपास आहे.तुरीच्या डाळीचे व्यापार देखील सुस्त पडलेले वाटतात.आफ्रिकेतील देशांतून तुरीची आयात वाढल्याने बंदरावर साठा वाढताना दिसतोय....तर नवीन वर्षात म्यानमारमधून तुरीची आयात वाढण्याची भीती व्यापारी सूत्रांनी व्यक्त केली आहे.

हमीभावाने खरेदी आवश्यक

यंदा सरकारने तुरीसाठी 6 हजार 300 रुपये हमीभाव जाहीर केला आहे.गेल्या हंगामात तुरीचे दर हमिभावाच्या दरम्यान राहिले.परंतु यंदा केंद्राने मुक्त आयात ,साठा मर्यादा लावल्याने दर दबावत आहेत.त्यामुळे यंदा तुरीला हमीभाव खरेदीचा आधार गरजेचा आहे.तूर पिकाचे १५ ते २० टक्के नुकसान झाल्याचे विविध भागातून रिपोर्ट येत आहे. सध्या तुरीला बाजारात ६१०० ते ६२०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.सध्या तुरीची डाळ ९० ते ९५ रुपये प्रतिकीलो भाव आहे व याचा भाव पेट्रोल,डिझेल किंवा इतर वस्तूनच्या तुलनेत वाढलेला नाही Yandache Tur Bajarbhav.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने